Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीवेस्ट टू वेल्थसाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता: मदनदादा भोसले

वेस्ट टू वेल्थसाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता: मदनदादा भोसले

किसन वीर वर कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाची कार्यशाळा संपन्न
भुईंज: राज्यातील साखर कारखान्याबरोबर अन्य औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पर्यावरण समृध्दतेसाठी यापुढील काळात वेस्ट टु वेल्थ या संकल्पनेतुन काम करावे लागणार आहे.
प्रेसमडपासून व स्पेंटवॉश पासून सीएनजी आणि वीज निमिर्तीसाठी केंद्र सरकारकडून निश्‍चित धोरण ठरविण्यासाठी सर्वांनी एकत्र बसुन एक संयुक्त समिती गठीत करणे गरजेचे असुन त्यासाठी नाबार्ड, राज्य बँक, व्हीएसआय, मिटकॉन, राज्य साखर संघ, इतर कंपन्या व साखर कारखान्यांनी एकत्र येऊन त्यांची एक समिती तयार करण्याची गरज असल्याचे सांगत पर्यावरणपुरक इंधनाच्या निर्मीतीसाठी सामुहिक सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले.
किसन वीर सहकारी साखर कारखाना आणि कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात औद्योगिक कचर्‍यापासून बायोगॅस आणि त्यापासून सीएनजी व ऊर्जानिर्मिती याविषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मदनदादा भोसले बोलत होते.
मदनदादा भोसले पुढे म्हणाले, कारखान्यातुन बाहेर पडणारी कोणतीही वस्तू टाकाऊ नसते त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे किसन वीर उद्योगात ऊभा राहिलेला सीएनजी प्रकल्प आहे. सीएनजी गॅसच्या प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सीएनजी आऊटलेट उभारण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे.
कारखान्याची डिस्टीलरी वर्षभर चालण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिनी त्यांना अपेक्षित असणारी पर्यावरणपुरक कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. याचा विशेष आनंद वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाबार्डचे एजीएम सुबोध अभ्यंकर यांनी आपल्या मनोागतात नाबार्ड ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी कटीबध्द असते. आजच्या कार्यशाळेतुन आपल्याला नवीन संधीचा शोध घेता येईल. इस्माचे कार्यकारी संचालक श्री. चौगुले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोजन असोसिएशनचे सुनिल नातू यांनी केले.
या चर्चासत्रात विविध साखर कारखाने व औद्योगिक क्षेत्रातील नामांकित सुमारे 50 हुन अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रेसमडपासून सीएनजी बनविणे खुप खर्चिक आहे. त्यावर एक अभ्यासगट तयार करून त्याचा अभ्यास करण्याचे ठरविण्यात आले.
उद्योग क्षेत्रातील कचर्‍यापासून बायोगॅस आणि त्यापासून सीएनजी व ऊर्जानिर्मिती तयार करण्याबाबत अवंत गार्दे सिस्टिम अ‍ॅण्ड कंट्रोल प्रा. लि. चेन्नईचे के. मोहनकुमार, प्राज इंडस्टीज पुणेचे बसवराज, जी. जी. पॉवर नवी दिल्लीचे रविकुमार, सिसटन इंडिया पुणेचे निलेश जाधव, उत्तम एनर्जीचे मुरलीधरन जयपाल व ग्रीन एलिफंटाचे संग्राम सिंग डायरेक्टर जनरल कांतीलाल उमप यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली. आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, केतनदादा भोसले, अ‍ॅड. जयवंतराव केंजळे आदी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular