Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीभुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

भुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

भुईंज : नवीन तरूणाईला उत्तेजन देणारे पारंपारिक खेळ भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सादर केल्याने युवा पिढीला या पारंपारिक खेळाचे महत्त्व कळेल आणि ते विद्यार्थी प्रेरणा घेतील असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्राचार्या एस.एस.कदम यांनी केले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज येथे भोंडला़ पाककला, पुष्परचना इत्यादि स्पर्धा पार पडल्या. यामध्ये माता व पालकांनीसुद्धा आपला सहभाग नोंदवला. त्यावेळी डॉ.सोनावणे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना प्राचार्या सौ.कदम म्हणाल्या की, जुन्या पिढीने ज्या ज्या संकल्पना राबवल्या त्या त्या आजच्या काळात लोप पावत चाललेल्या असून त्याला उजाळा देण्यासाठी अशा प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांना दाखविणे गरजेचे आहे. यातूनच या खेळांना पुर्नजीवन मिळेल.
भोंडला़, पुष्प रचना आणि पाककला स्पर्धेत शाळेच्या मुलींनी मोठा सहभाग नोंदवला तर माता व पालकांनी सुद्धा आपला सहभाग यावेळी दर्शविला.
पाककला स्पर्धेत स्मिता राहुल दळवी, अंबीका प्रमोद भोसले, साधना विजय भोसले, प्रमोद भोसले तर पुष्पकला स्पर्धेत दिप्ती गुंजाऴ, वैष्णवी कांबळे, अनुष्का साबळे़, दिव्या वाघमारे़, आकांक्षा जाधव़, श्रावणी सुतार, धनश्री पवार यांनी या स्पर्धेत क्रमांक मिळवले. यावेळी डॉ.सोनावणे यांचे मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी व स्पर्धासाठी व्याख्यान झाले. तर कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सौ.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ शिक्षीका बी.वाय.आहिरे, के.डी.जाधव,़ इटाले एच.एस.व विद्यालयातील सर्व महिला शिक्षका यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular