मेढा ( वार्ताहर ): आज कित्येक कुटुंबातील मुले आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी नाकार देेतात त्यांचा तिरस्कार करत आहेत हे चित्र आपणास आजूबाजूला आपल्या समाजात पहावयास मिळते मात्र जावली तालुक्यातील बिभवी गावात वेगळे चित्र दिसून आले संगिता संजय परिहार यांनी आपल्या सासू-सासरे यांच्या पश्चात त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण म्हणून आई आप्पा या वृद्धाश्रमाची निर्मिती करून समाजाला अनोखा संदेश दिलेला आहे.
समाजात वृध्द आई वडिलांचा तिरस्कार केला जातो. ज्यांनी आयुष्यभर परिश्रम करून लहानाचे मोठे केले त्यांनाच घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो परंतु समाजात अशीही व्यक्ती आहेत की मनापासून सर्वांवर प्रेम करून जिवनाचा अर्थ दाखविला आहे.महात्मा फुले आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान बिभवी यांच्या वतीने आई आप्पा वृद्धाश्रमाचे मेढा पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी सोनवणे मॅडम मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
या उद्घाटन सोहळ्यास आरपीआयचे जावली तालुका अध्यक्ष रोकडे, बिभवी गावच्या सरपंच .सौ. जयश्री जाधव, प्रवीण देशमुख दुदळे सर,मंगल देशमुख,राजेंद्र जाधव, ग्रामसेवक सुरवसे, सिद्धार्थ परिहार,रजंना परिहार,शिवाजी जाधव,सुनिल शिंदे,शंकर परिहार,बापु परिहार,धोंडिबा कांबळे,सुहास परिहार,अमित परिहार आणि ग्रामस्थ उपस्थित होते
सासु सासरे यांची आठवण म्हणुन ” आई आप्पा ” वृध्दाश्रमाची स्थापना
RELATED ARTICLES