Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या पण माती उत्खनन करणाऱ्यांना कोरोनाची भिती नाही का ?...

अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या पण माती उत्खनन करणाऱ्यांना कोरोनाची भिती नाही का ? नागरीकांमध्ये जोरदार चर्चा सुरू

मेढा ( वार्ताहर ) -सर्वत्र कोरोनाची भिती पसरली असतानाच अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या पण माती उत्खनन करणाऱ्यांना कोरोनाची भिती वाटत नाही का ? यांना पाठबळ कोणाचे याची चर्चा मेढा आणि परिसरातील नागरीकांत सुरू आहे.

वैध मार्गाने असो किंवा अवैध मार्गाने या विभागाला माती उत्खननाची चांगलीच सवय लागली आहे . परंतु या भयानक परिस्थीतही चालू असणारी उत्खनन प्रक्रिया योग्य आहे का याची ही चाचपणी प्रशासनाकडून होणे गरजेचे असल्याची भावना मेढा आणि पंचक्रोशीतील नागरीकांतून व्यक्त होत आहे.

मेढा आणि विभागात दिवस-रात्र माती उत्खनन प्रक्रिया राबवली जात आहे.कोणालाही वेळेचे बंधन नाही.जेवढ घेता येईल तेवढे किंवा त्यापेक्षा दुप्पट बोजा या वाहनांवर पहावयास मिळत आहे . भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांवर कोणाचे लक्ष नाही कि जाणुनबुजुन कानाडोळा करण्यात येत आहे असा प्रश्न निर्माण होत असून आता तरी प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष घालून या जादा उत्खनन बाबत कारवाईचा बडगा उचलावा या आशयाच्या चर्चा नागरीकांमध्ये रंगू लागल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular