मेढा प्रतिनिधी – सामाजिक कार्याची आवड आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नवले कुटुंबीयाकडून जिल्हा परिषद प्राथ.शाळा बिभवी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मौजे बिभवी गावातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वेंदे यांच्या मार्गदर्षणाखाली शालेय समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थित नवले कुटुंबातील सदस्य श्री. तुकाराम नवले, सौ. मनिषाताई आणि उपस्थित मान्यवरांचे वतीने साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही त्यांनीही विद्यार्थी वर्गास साहित्याचे वाटप करीत असल्याचं मुख्याध्यापक वेंदे यांनी सांगून त्यांच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी उपस्थित सर्वांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. वेंदे सर यांनी आभार मानले या वेळी त्यांना सहकारी यांची मोलाची साथ लाभली.
जिल्हा परिषद प्राथ.शाळा बिभवी येथे शैक्षणिक साहित्याचे नवले कुटुंबीय कडून वाटप
RELATED ARTICLES