मेढा प्रतिनिधी -शनिवार दि. 15/07/2023 रोजी विध्यार्थी विकास सेवा संस्था म्हाते बुद्रुक च्या वतीने सालाबादप्रमाणे 24 वा विध्यार्थी गुणगौरव व पारीतोषीक वितरण समारंभ संपन्न झाला.या समारंभात 130 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, तसेच यशवंत विध्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले तसेच सेवानिवृत्त व पदोन्नती झालेल्या सदस्यांचा आणि कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या समारंभाला जि.प.प्राथ.शाळा म्हाते बु!! चे माजी विध्यार्थी , म्हाते बु!! गावचे अमेरिका स्थित सुपुत्र,अकेटेक कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मा. ज्ञानेश सपकाळ भाऊ, त्यांच्या सौभाग्यवती डॉ. अंजली सपकाळ व त्यांच्या दोन्ही कन्या श्रेया व स्वराली आणि भगिनी सौ.अलकाताई देशमुख प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. अलकाताई देशमुख यांच्या वतीने त्यांची नात बेबी अलिना जनानी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कुलबॅग भेट देण्यात आल्या. संस्थेचे हितचिंतक श्री दिलीप जाधव साहेब यांच्याकडून संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे १ली ते १०वी प्रत्येक वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना व श्री सखाराम दळवी बापू यांच्याकडून संस्थेच्या माध्यमातून ८वी ते १०वी या वर्गांत प्रथम ३ नंबर च्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरुपात बक्षीस देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी मा. संजयजी धुमाळ, केंद्रप्रमुख मा. विजय देशमुख गुरुजी, केंद्रप्रमुख – अरविंद दळवी गुरुजी, जावली सहकारी बँकेचे संचालक आनंदराव सपकाळ ,विद्यार्थी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्रीरंगभाऊ सपकाळ, सचिव – श्री. चंद्रकांत शेलार, खजिनदार – श्री. तुकाराम गोगावले, उत्कर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष व वेण्णा निरंजना पतसंस्थेचे संचालक विनोदराव शिंगटे, संपतराव सपकाळ, के.डी. सपकाळ, कृष्णा सपकाळ, जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक – हनुमंतराव शिंगटे, मेढा सोसायटीचे मा. संचालक – राजाराम गोगावले, सरपंच – कृष्णा कांबळे, उपसरपंच – अशोक सपकाळ, मा.उपसरपंच धोंडीराम बुवा सपकाळ , अक्षय गोगावले, संपत रा. सपकाळ, सुभाष दळवी गुरुजी, तुकाराम ग. शेलार गुरुजी, पांडुरंग सपकाळ गुरुजी, उद्योजक किसन मा. सपकाळ, म्हाते खुर्द गावचे सरपंच मा श्री राजाराम दळवी सर ,सचिन पां. सपकाळ, सुर्यकांत रा. सपकाळ, तेजस शेडगे, महादेव कदम, निवृत्ती सपकाळ, दत्तूबुबा सपकाळ, बजरंग दळवी, निलेश सपकाळ,चंद्रकांत सपकाळ आदी मान्यवर तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद , ग्रामस्थ, विद्यार्थी , युवा कार्यकर्ते , महिला , पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, म्हाते बु!! गावचे अमेरिका स्थित सुपुत्र , अकेटेक कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट मा. ज्ञानेश सपकाळ भाऊ यांनी स्वतःची जडणघडण आपल्या शब्दांत प्रभावीपणे मांडली त्यांच्या वक्तृत्वाने सर्वांची मने भावुक झाली. बिकट परिस्थिती वर मात करुन उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाऊनी कार्यक्रमादरम्यान पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली.
गटशिक्षणाधिकारी श्री.संजय धुमाळ सरांनी संस्थेचे कौतुक केले ,जावली तालुका शिक्षक संघटनेचे मा.अध्यक्ष – मा. रघुनाथ दळवी गुरुजी, आनंदराव सपकाळ ,माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा पानसकर , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अंकुश शिंदे गुरुजी, तन्मय शेडगे यांनी आपली मनोगते व्यक्त केले, सचिव चंद्रकांत शेलार यांनी प्रास्ताविक केले, संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिंगटे यांनी केले.
विध्यार्थी विकास सेवा संस्था म्हाते बुद्रुक च्या वतीने विध्यार्थी गुणगौरव व पारीतोषीक वितरण समारंभ संपन्न
RELATED ARTICLES