मेढा ( वार्ताहर ) -सध्या वाढत जाणारा लॉक डाऊन गंभीर विषय बनला असून यात प्रशासन आणि नागरीकांत वेळीच समन्वय साधला जाणे आवश्यक बनले आहे.
या कडक लॉक डाऊनमुळे छोटे,मोठे व्यापारी, कामगार वर्ग, यांना व्यवहारीक नुकसान सहन करावे लागत आहे हाती पैसा नाही मात्र फायनान्स कंपन्या आपले हफ्ते गोळा करताना सामाजिक भान विसरत आहेत, नागरीकांचा बाजारहाट संपला आहे, अशी विविध कारणे आहेत ज्यामुळे नागरीक त्रासले आहेत या समस्यांचे निराकरण करा, नागरीकांना थोडा वेळ दया आणि काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या असे मत नागरिकांतुन व्यक्त असून कोरोना संख्या वाढत आहे हे खरे असले तरी जीवन जगावेच लागणार आहे तर हा निर्बंध कशाला असा प्रश्नही निर्माण होत आहे.
कोरोनाचे संकट, चक्री वादळाचे संकट तसेच विविधरित्या निर्माण होणारे नैसर्गिक संकटाची वाढत जाणारी रुपे पाहून नागरीक पुर्णपणे गडबडून जात आहेत त्यातच अजुन वाढलेला लॉक डाऊन गंभीर रुप धारण करतोय की काय अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने काम करीत असताना नागरीकांच सहकार्य अपेक्षित असून या दोघात योग्य समन्वय साधला जाणे महत्वाचे ठरणार आहे.
कडक लॉक डाऊन काळात प्रशासन आणि नागरीकांत समन्वय आवश्यक
RELATED ARTICLES