कराड: राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालूक्यातील शेरे व रेठरे बुद्रुकला ठिकठिकाणी गाठीभेट घेत पाहुणचार घेतला. सदिच्छा भेटी, सांत्वन यासह अनेकांची विचारपूस करण्यासाठी आ. चव्हाण यांनी या विभागाचा दौरा केला. सुरुवातीला शेरे येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंतराव निकम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांचे निकम कुटूंबियांनी जोरदार स्वागत केले.
यावेळी आ. आनंदराव पाटील, रघुनाथराव कदम, अजितराव पाटील-चिखलीकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, शिवाजीराव मोहिते, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, नितीन थोरात, नंदकुमार डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. तेथील पाहुणचार घेवून त्यांनी यशवंतराव मोहिते यांचे निकटचे सहकारी शंकरराव उर्फ एस. पी. निकम यांच्या घरी भेट देवून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. रेठरे बुद्रुक येथे त्यांनी कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देवून श्री. मोहिते यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तेथे त्यांचा सत्कारही झाला.
यावेळी उत्तमराव मोहिते, आबा सुर्यवंशी, जयेश मोहिते, जयप्रकाश साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनतर त्यांनी श्री. कार्वेकर, (कै.) एम. एस. चव्हाण, सोसायटीचे माजी चेअरमन (कै.) कमलाकर बाजीराव मोहिते, सुनिल शिंदे, गणीभाई आंबेकरी, सचिन सातपुते, लक्ष्मण साळुंखे, डॉ. सुरेश पवार यांच्याकडे भेटी दिल्या. व पाहुणचार घेतला.
आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या शेरे व रेठरे बुद्रुकला गाठीभेटी
RELATED ARTICLES