कराड: कराड येथील शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील हजारो युवा वर्गाशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी मुक्त संवाद साधला. यावेळी अॅड.रविंद्र पवार, प्राचार्य डॉ.मोहन राजमाने, किसनराव पाटील, सदानंद चिंगळे, जितेंद्र डुबल उपस्थित होते. सदर कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित केला होता.
बोला मित्रत्वाच्या भावनेने या घोषवाक्याने तरूणांचे विचार, ध्येय, संस्कार, तंत्रज्ञान, सेवा, प्रशासन, धोरणे आणि व्यक्ती अशा विविध विषयांवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुक्त संवाद साधला. तसेच उच्च शिक्षणातील आव्हाने, जागतिक आर्थिक मंदी, मंदीचा सामान्य जनतेवर झालेला परिणाम, उच्च शिक्षणातील वाढती बेरोजगारीस, कश्मिरमधील कलम 370 व कलम 35 ए, आजची बेरोजगारी ही केवळ शासनाच्या धोरणाचाच परिणाम आहे का? नोकर्या मिळविणे व नोकर्या कमी होण होणे याला जबाबदार कोण? सरकार बदलले, धोरण बदलली व आम्हा तरूणंाच्या अडचणी तशाच राहिल्या, शिक्षणात आणि नोकरीत समानता आहे असे कागदोपत्री वाटते पण प्रत्यक्षात तसा अनुभव येतो का? देशाला दोन कोटी रोजगाराचे स्वप्न दाखविले पण ते वास्तवात दिसत नाही. शेतमालाला भाव नाही. अर्थव्यवस्था ढासळली. रूपयाचे अवमुल्यन सातत्याने होत आहे. आपला देश तरूणांचा देश म्हणुन गणला जातो परंतु तरूण्ध कौशल्यहिन दिसतोय. रोजगार नाही पण शाईन इंडियाख् स्टार्ट ऑफ इंडिया आणि मेक दन इंडिया केवळ जाहिरातबाजी नवहे का? आज लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा आहे? अशा युवकर्गाच्या असंध्य प्रश्नंची समर्पक उत्तरे देवून युवकांची मने जिंकली. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद पाहुन मी भारावुन गेलो. स.गा.म. महाविद्यालयाने केलेली प्रगती व घेतलेली झेप संपुर्ण राज्याला आदर्शवत अशीच आहे.
नोटबंदी व जीएसटी मुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये बेकारी वाढली आहे. मुक्त वातावरणामुध्ये व नि:पक्षपातीपणे निवडणुका पार पाडलया पाहिजेत. आर्थिक स्वार्थासाठी लोक पक्ष बदलत आहेत. ही चिंतेची बाब आहे. आपण सर्व गुरूजन वर्गानी सामाजिक न्यायाची जिंकायला सज्ज झाले पाहिजे असे आवाहन केले.
युवा वर्गाशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांचा मुक्त संवाद
RELATED ARTICLES

