कराडः भाजप सरकार हे फक्त घोषणाबाजी करणारे सरकार आहे. राज्यातील सरकार मोदींच्या नावाखाली कामापेक्षा घोषणाबाजीत रमले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात मोठी अर्थिक मंदी आली आहे. देशातील अनेक मोठया कंपन्या बंद झाल्या असून, त्यामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. वहागाव (ता.कराड) येथे आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 1 कोटी 55 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, जि.प.माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, जि.प. सदस्य निवासराव थोरात, प.ं स.सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सरपंच अॅड. नरेंद्र नांगरे- पाटील, सरपंच शकुंतला पुजारी, उपसरपंच सचिन पवार, दिपक पवार, विलासराव पाटील, पंकज पिसाळ, वैभव थोरात, नितीन थोरात-सवादेकर, सुभाष पवार, संभाजी पवार, भार्गव पवार, माणिक पवार, संदिप पवार, अनिकेत पवार आदींची उपस्थिती होती.
आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांशी काहीही देणेघेणे नसणारी व भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविलेली त्याचबरोबर लोकांनी लोकांसाठी उभारलेल्या संस्था खाणारी मंडळी स्वत:च्या संस्था व त्यातील गैरकारभार लपविण्यासाठी राजकारणाचा व सत्तेचा आधार घेवू पाहत आहेत. अशा मंडळींपासून लोकांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे. लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने आता भाजप विरोधात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, वहागाव गाव हे डाव्या विचारसरणीचे गाव आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत या गावाने सैदापूर प्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांना बहुमताने निवडून दिले होते. बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पवार यांनी सूत्रसंचालन केले. सचिन पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
केवळ घोषणाबाजीवर चालणारे भाजप सरकार: आ.पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES