मल्हारपेठ: उरूलच्या सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा मध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले. सातारा जिल्हा क्रीडा विभागातर्फे घेतलेल्या स्पर्धेत हे यश प्राप्त केले.
वैष्णवी देसाई व श्रावणी फडतरे यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केले. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धिबळ स्पर्धेत शेजल भोसले व श्वेता शेडगे व कादंबरी निकम यांनी तालुका स्तरावर यश मिळविले व त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
कराटे स्पर्धेत अफटाब मुलानी याचीही जिल्हास्तरावर निवड झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक रंजना नांगरे व सुमित सर्गडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्था चालक निवास निकम, मुख्याध्यापिका अरुणा सदाफुलें उपमुख्याध्यापिका सुवर्णा निकम, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश
RELATED ARTICLES