मल्हारपेठ: मल्हारपेठ येथे गणरायाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देणेत आला. सर्व घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी भाविकांनी गणरायाला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळण करीत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या च्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला.
घरगुती गणेश मूर्ती भाविकांनी पवार आळी कोयनाकाठ मंदृल हवेली घाट तसेच निसरे फरशी पूल आदी ठिकाणी विसर्जित केल्या सार्वजनिक मंडळ गणेश मूर्तींचेही विसर्जन निसरे फरशी पूल कोयना नदी येथे करणेत आले. मल्हारपेठ च्या हनुमान चौकातील समर्थ गणेश मंडळ ने गिरेवाडी येथील संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था च्या भजनी मंडळ च्या साथीने वारकरी दिंडी च्या खास आकर्षण होते तसेच पानस्करवादी च्या हनुमान मंडळ ने ब्रह्मांड ढोल ताशा पथकाच्या गजरात गणरायाला निरोप दिला.
मल्हारपेठ च्या शिवशक्ती गणेश मंडळ ने पारंपरिक प्रथेप्रमाणे पालखीतून श्री गणेशाची मिरवणूक काढली मल्हारपेठ येथीलसर्वश्री नायिकबा जयमल्हार विट्ठल सिद्धिविनायक नवचैतन्य शिवतेज नवतरुण अष्टविनायक बालाजी तसेच हनुमान सेवा आदी मंडळांनी गंधर्व बँड तसेच समता बेंजो सरस्वती बेंजो साई बेंजो व बारामतीच्या बेंजो पथकाच्या खास आकर्षणाने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
सर्वच विसर्जन मिरवणुकीत कोठेही कसलाच अनुचित प्रकार घडला नाही पाटणच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सह्ययक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांच्या पोलीस व होमगार्ड पथकाने समक्ष भेट देऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता सर्वच मिरवणुका शांतता पूर्ण वातावरणात संपन्न झाल्या सर्वांनी गणरायाला आनंदात निरोप दिला.
मल्हारपेठ येथे गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
RELATED ARTICLES