Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने विकास करणार : आमदार शंभूराज देसाई

सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने विकास करणार : आमदार शंभूराज देसाई

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई यांचे पाच वर्षात मतदारसंघात सुरु असलेले विकासात्मक कामामुळेच आम्ही त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर आणि उघड प्रवेश करीत असून आम्हाला आ.शंभूराज देसाईंच्या सोबतीने विकासप्रवाहात सामील झाल्याचा आम्हाला आनंद होत असल्याचे जाहीर मत पाटण तालुक्यातील 102 गावांतील पाटणकर गटातील 1621 कार्यकर्ते,पदाधिकार्‍यांनी दौलतनगर येथील जाहीर मेळाव्या दरम्यान दिले.
विकासाची दुरदृष्टी असणारे आ. शंभूराज देसाई हेच मतदारसंघाचा कुशलपणे विकास करु शकतात अशी आमची खात्री झाल्यानेच आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केले असून याचा आम्हाला अजिबात पश्चाताप नसल्याचेही 1621 कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.नवे जुने न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने मतदारसंघाचा विकास करणार असल्याची ग्वाही आ. शंभूराज देसाईंनी आज मेळाव्यात उपस्थित सर्व पाटणकर गटातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्यांना दिली.
दौलतनगर ता.पाटण येथे आ. शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली गत महिन्याभरामध्ये शिवसेना पक्षात 102 गांवातील पाटणकर गटाच्या 1621 कार्यकर्ते,पदाधिकार्‍यांनी जाहीर प्रवेश केला असून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या या 102 गावातील 1621 कार्यकर्ते,पदाधिकार्‍यांचा जाहीर मेळावा आ.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केला होता.याप्रसंगी प्रवेश केलेले सर्वच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या मेळाव्यास आर्वजुन उपस्थित होते.
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील प्रमुख सर्व पदाधिकारी व 102 गावातील पाटणकर गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे जाहीर प्रवेश शिवसेना पक्षात घडवून आणणारे देसाई गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,गत महिन्याभरात आपले पारंपारिक विरोधक असणार्‍या पाटणकर गटातील त्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाटणकर गटाला कंटाळून माझे नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आजअखेर पाटण तालुक्यातील 102 गावातील 1621 पाटणकर गटाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हे शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत.गत पाच वर्षात प्रत्येक गांवात विकासाचे प्रलंबीत काम देण्याचे आपण काम केल्यामुळेच विकासाच्या प्रवाहापासून अनेक वर्षे दुर राहिलेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मोठया संख्येने विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेवून काम करणार्‍या नेत्याला जाहिर पाठींबा देण्याची भूमिका या नागरिकांनी आणि महिलांनी घेतल्यामुळेच एवढया मोठया प्रमाणात नागरिक व महिला एकत्र आपणांस पहावयास मिळत आहेत. आतापर्यंत विकासाच्या अपेक्षित या 102 गावांतील 1621 नागरिक आणि महिला होत्या परंतू त्यांचा मुलभूत विकास त्यांच्या यापुर्वीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवाकडून न झाल्यानेच या नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये परिवर्तन झाले आणि माझे नेतृत्व स्विकारले याचा मला खुप आनंद आहे. पाटणकर गटाला कंटाळून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या सर्व पुरुष आणि महिलांचे,मातांचे मी शिवसेना पक्षात पक्षाचा आमदार या नात्याने जाहीर स्वागत करतो.तुम्ही आता आमचे झाला आहात त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. ज्या विकासाच्या मुद्दयासाठी आपण एकत्र येवून माझेवर विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ करण्याचेच काम मी भविष्यात करणार असून नवे जुने पदाधिकारी,कार्यकर्ते असा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यास मी कटीबध्द आहे.असे सांगून ते म्हणाले,2014 च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदारसंघातील जनतेने मोठया विश्वासाने 18824 मताधिक्क्याने मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनंच करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामुळेच पाच वर्षात 1766 कोटी 79 लाख रुपयांचा विकासनिधी पाटण मतदार संघाच्या विकासासाठी आणू शकलो,जनतेचे आर्शिवाद आणि तुम्हा कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळेच हे सर्व मला शक्य झाले.
शिवसेना पक्षात पाटणकर गटाच्या नेतृत्वाला कंटाळून रोज नव्याने अनेक गांवाचा जाहीर प्रवेश होत आहे यावरुनच मतदार संघाचे विकासात्मक नेतृत्व कोण आहे हे सिध्द होत आहे.आज याठिकाणी जमलेले सर्व पाटणकर गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेना पक्षात ठाम आहेत हे आजच्या उपस्थितीवरुन जाहीरपणे स्पष्ट होत आहे असेही आ.शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular