मल्हारपेठ: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तांबवे केंद्रातील पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तांबवे केंद्रातील आण्णा बाळा पाटील हायस्कूल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साजुर दक्षिण तांबवे या शाळेतील सुमारे 190 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वरूपात स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल असे साहित्य वाटप केले.
सातारा जिल्हा अनिसतर्फे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, जिल्हा बुवाबाजी संघर्ष विभाग प्रमुख भगवान रणदिवे, मल्हारपेठ शाखा कार्याध्यक्ष दादासाहेब पवार, अमोल जाधव, रमेश जगताप यांचे हस्ते हे साहित्य वाटप झाले. याकामी भाग शिक्षण विस्तार अधिकारी जमीला मुलानी, एस. व्ही. पोळ प्रभाकर मोरे, मोहन शिनगारे आबा साहेब साठे यांचे सहकार्य लाभले.
तांबवे केंद्रातील पूरग्रस्त शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप
RELATED ARTICLES