कराड: कराड अर्बन बँकेने आजवरच्या शतकोत्तर वाटचालीत काळानुरूप आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून त्यातून नवीन प्रेरणा व चैतन्य मिळवून बँकेचा पाया अधिकच भक्कम केला आहे. शतकपूर्ती करणार्या या बँकेची आता शतकोत्तर वाटचाल सुरू झाली आहे. बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
बँकिंग क्षेत्रामध्ये गेल्या 2/3 वर्षांपासून नोटाबंदी, जीएसटी करप्रणालीचा अवलंब, थकीत कर्जे यामुळे हा कालखंड आव्हानात्मक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मार्च 2019 अखेर बँकेने केलेली कामगिरी उत्तम आहे. गतवर्षी सरकारी कर्जरोखे व्यवहार बाजारातील चढ-उतारांमुळे कराव्या लागलेल्या तरतुदींची रक्कम प्रमाणापेक्षा जास्त असल्याने बँकेला रु.31 कोटींचा व्यावहारिक जमाखर्चामुळे तोटा झाला होता. केवळ एक वर्षांच्या अल्पावधीतच बँकेने या तोट्यापैकी 70% तोटा भरून काढण्यात यश आले आहे आणि रु.9.77 कोटींचा संचित तोटा शिल्लक होता. जून 2019 अखेर तोट्याची उर्वरित रक्कम भरून काढणारा ढोबळ नङ्गादेखील बँकेने मिळविला असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणातून बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी दिली. ते पुढे म्हणाले, मार्च 2020 अखेर बँकेची आर्थिक स्थिती नफ्याकडे नेण्यास सर्वोच्च प्राधान्यक्रम असून त्याला चांगले यश मिळत आहे. सभासद, ग्राहक व हितचिंतकांनीही वस्तुस्थिती समजावून घेऊन बँकेला साहाय्य करावे. नजीकच्या काळात बँक व्यवसाय वाढीबरोबरच उत्तम नङ्गाक्षमता संपादन करेल. सुरू झालेल्या प्रगतीला अधिक स्थिरता लाभेल आणि गती मिळून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येतील. गेल्यावर्षी तोट्यामुळे व यावर्षी संचित तोट्यामुळे आपल्याला कायद्यातील बंधनामुळे, संचालक मंडळाला इच्छा असूनदेखीललाभांश देता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. पुढील वर्षी लाभांश देण्यासच सर्वोच्च प्राधान्य देत यावर्षीचे नियोजन केले असून त्यानुसार आपली वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे संचित तोट्याची रक्कम पहिल्या तिमाहीत भरून काढली आहे. आता उर्वरीत कालावधीत वसूली व व्यवसायवाढीद्वारे उत्पन्नात वाढ करून लाभांश देण्यासच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिल असा विश्वासदेखील याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
कराड अर्बन बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कराड येथील पंकज मल्टीपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखालीनुकतीच (रविवारदि.22 रोजी) खेळीमेळीच्या वातारणामध्ये संपन्न झाली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव आणि सर्व संचालकांसह सभासदांची लक्षणीय उपस्थिती होती.
अर्बनकुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, थकीत कर्ज वसुलीसाठी उपाययोजना करताना आणि ग्राहकांना आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने ऑनगोईंग एन.पी.ए. या संकल्पनेचा अवलंब बँकेने केला आहे. त्यामुळे ग्राहकांचे सिबिल स्कोअरदेखील उत्तम राहण्यास मदत होईल. याचाच परिणाम म्हणजे गेल्या चार वर्षापासून संपुर्ण बँकिंग क्षेत्रामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कर्जे थकीत राहण्याच्या प्रमाणावर नियंत्रण राखत बँकेने निव्वळ एन.पी.ए. 7.49% राखण्यात यश मिळविले आहे. काही खात्यांच्याबाबत सिक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत आणि इनॅलव्हन्सी अँड बँकरप्टसी कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. बँकेच्या सर्व प्रमाणकांचा विचार केला तर बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून अर्थव्यवस्थेतील सद्यस्थिती होणार्या बदलाला सामोरे जाण्यास बँक पूर्णपणे सज्ज आहे. बँकेला शंभर वर्षांचा इतिहास असून अशा आव्हानात्मक कालंखडास कसे सामोरे जायचे याचा मोठा अनुभव बँकेकडे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सहकार क्षेत्र भक्कम आणि सुदृढ करण्यात सभासदांचा मोठा वाटा असतो; त्यामुळे सभासदांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी, प्रसंगी बँकेकडून माहिती घ्यावी. सांगोपसांगी आणि दिशाभूल करणार्या माहितीवर विसंबून राहू नये असे आवहन याप्रसंगी त्यांनी केले.
मार्च 2019 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.4560 कोटी असून रु.45.55 कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु.21.42 कोटींचा नङ्गा झाला आहे. त्यामध्ये बँकेच्या 21 शाखांना रुपये एका कोटीपेक्षा जास्त नङ्गा झाला आहे. सभासद संख्येत 2212 ने वाढ होत भागभांडवलामध्ये रु.4.61 कोटींची वाढ झाली आहे; तसेच भागभांडवलाचा दुय्यम भाग म्हणून दिर्घ मुदतीच्या ठेवींच्या (एल.टी.डी.) रूपाने रू.17 कोटी अशी भरभक्कम वाढ झाली आहे. बँकेकडे 100 वर्षांच्या ऊर्जेने भारलेली शिदोरी आहे, नवदृष्टी व भविष्यकाळाचा वेध घेत वाटचाल करणारे सम्यक नेतृत्त्व आहे, नियोजनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे, कारभारात पारदर्शकता आहे, सभासद-ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य लाभले आहे.
कराड अर्बनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
RELATED ARTICLES

