कराड: कराड दक्षिणमधील मुंबईस्थित नागरिकांचा कौटुंबिक स्नेहमेळावा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी तुर्भे-नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला माजी मंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नोकरीधंद्याच्या निमित्ताने कराड दक्षिणमधील हजारो नागरिक मुंबईत राहत आहेत. या नागरिकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, सातारा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस बळवंतराव पवार, माथाडी कामगार नेते पोपटशेठ पाटील, अविनाश रामिष्टे, मुंबईतील ओंकार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश ताटे, भाजपाचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष संपतराव शेवाळे, कराड सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव कचरे, नवी मुंबईच्या नगरसेविका श्रीमती दमयंती आचरे, भारती पाटील, शिवसेनेचे कराड दक्षिण संपर्कप्रमुख भीमराव कळंत्रे, उद्योजक प्रदीप साळुंखे, चंद्रकांत शेवाळे, पांडुरंग शेटे, राजाराम पाटील, किसन जाधव, दादासो जगताप, बाबासो जाधव, दिपक शेवाळे यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मुंबईस्थित कराड दक्षिणमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतुलबाबांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणेतील मुंबईस्थित नागरिकांचा रविवारी मेळावा
RELATED ARTICLES