कराड: विधानसभा निवडणूक व लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या एक हजार 767 केंद्राध्यक्ष व सहायक अधिकार्यांचे आज प्रशिक्षण झाले. यावेळी गैरहजर राहणार्या दिडशे जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात प्रशिक्षण झाले. पहिल्या सत्रात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रशिक्षण झाले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यंानी कराड उत्तरमधील नियुक्त कर्मचार्यांना निवडणुकीबाबत माहिती देत प्रत्यक्ष मतदान केंद्रातील जबाबदारी, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन हाताळणी आदींबाबत त्यंानी माहिती दिलली. कराड उत्तरासाठी नियुक्त केलेल्या 792 केंद्राध्यक्ष व सहायक अधिकार्यांपैकी 27 अधिकारी अनुपस्थित होते.
दुपारच्या सत्रात कराड दक्षिण मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांचे प्रशिक्षण झाले. निवडणुक निर्णय अधिकारी उत्तर दिघे व सहाय्यक निवडणुक अधिकारी समीर यादव यांनी प्रशिक्षण दिले.
दक्षिणसाठी 975 केंद्राध्यक्ष व सहायक अधिकार्यंाची नियुक्ती केली आहे. त्यापैकी 103 अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले. गैरहजर अधिकार्यांना निवडणुक निर्णय अधिकारी दिघे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले.
कराडला निवडणुक प्रशिक्षण; दक्षिणेतील 103, उत्तरेतील 27 जणांची दांडी
RELATED ARTICLES

