मल्हारपेठ: मल्हारपेठ येथील अंगणवाडीतर्फे पोषण मेळा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहा वर्षा पर्यतच्या मुलांना सकस पोषक संतुलित आहार मिळावा या उद्देशाने या पोषण मेळा चे आयोजन केले होते.
यावेळी मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.भोईर, डॉ.सोहेल शिकलगार तसेच आरोग्य सेविका अनिता पवार, अश्विनी बहुलेकर यांचे हस्ते उदघाटन झाले.
यावेळी मान्यवर वक्त्यांनी सहा वर्षा पर्यंतच्या बालकांची घायवायची आरोग्य काळजी तसेच त्यांना देण्यात येणारा नियमित पोषण आहार याचे फायदे याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. तसेच महिला माता पालक व अंगणवाडी यांचेकडून या बाबींचा पाठपुरावा व अमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अंगणवाडी वर्गात बाळाला घास भरवा तसेच माझ्या बाळाच्या भविष्याचे झाड हे खेळ घेतले तसेच यावेळी पोषण आहार अंतर्गत विविध पाककला कृतीची मांडणी केली होती. सुवर्णा हिरवे यांनी प्रास्ताविक केले.
उषा लोहार यांनी कृती कार्यक्रमची माहिती दिली. यावेळी मुख्याधिपिका स्वाती तोरणे, सरिता फले, शोभा पोवार, भारती कुलकर्णी, सिंधू पानस्कर, कल्पना चव्हाण तसेच महिला माता पालक बहुसंख्येने हजर होते.
मल्हारपेठ येथील पोषण मेळा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES