कराड : प्लास्टिक मुक्त मलकापूरसाठी नगरपरिषदेच्या मार्फत मोहिम राबविण्यास सुरूवात झाली. महात्मा गांधी जयंतीनिमित्त या उपक्रमास मान्यवरांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली.
मलकापुर नगरपरिषदेमार्फत केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या आदेशान्वये राष्ट्रपिता महात्मा गांंधीयांच्या 150 व्या जयंतीनिमत्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी सन 2014 पासुन देशामध्ये सच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानास 5 वर्षे पुर्ण होत असल्याचे अनुषंगाने अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने स्वच्छता हिच सेवा या विषयावर एक देशव्यापी चळवळ सुरू करण्यासाठी 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्याचे शासन निर्देश आहेत. त्या अनुषंगाने मलकापुर नगरपरिषदे मार्फत कार्यक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम, स्वच्छ होर्डिंग मार्फत प्रबोधन मार्फत प्रबोधन करणेत आले आहे.
बुधवार दि. 2ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीच्या अनुषंगाने मलकापुर नगरपरिषद बहुउद्देशिय इमारत लक्ष्मी नगर या ठिकाणी सकाळी 8 वाजता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले. तसेच नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांनी प्लॅस्टिक बंदीची शपथ घेऊन मलकापुर शहरात त्याची पुर्णपणे अमंलबजावणी करण्याचा व खर्या अर्थाने वसुंधरेचे संरक्षण करणेचा दृढ निश्चय व संकल्प केला.
या कार्यक्रमास मलकापुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम धनंजय येडगे, उपनगराध्यक्ष तथा सभापती पाणी पुरवठा सार्वजनिक आरोग्य व जलनिस्सारण समिती मनोहर भास्करराव शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी व नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्लास्टिाक मुक्तीसाठी मलकापरु पालिकेने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.
मलकापूर नगरपरिषदेची प्लास्टिकमुक्तीसाठी मोहिम
RELATED ARTICLES