कराड: वंचित, अल्पसंख्यांक समाजाच्या उत्कर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. कराड दक्षिणमधील समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. मलकापूर येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित मुस्लिम समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, म्हाडाचे संचालक मोहनराव जाधव, आर. टी. स्वामी, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, दयानंद पाटील, रियाजभाई मुल्ला, फैय्याज मुल्ला, राजू मुल्ला, नगरसेवक दिनेश रैनाक, गोटेचे सरपंच लाजम होडेकर, कृष्णा कराड तालुका अॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष गफ्फार नदाफ, राजू आगा होते.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. काही गावांमध्ये दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाहीत. दफनभूमीच्या संरक्षण भिंतीच्या समस्या आहेत. त्याचबरोबर समाजामध्ये शिक्षण, रोजगाराच्या समस्या भेडसावत आहेत. आगामी काळामध्ये या मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ज्यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले त्यांना या भागाचा शेती सिंचन, शिक्षण, रोजगाराचा प्रश्न सोडवता आला नाही. पण भाजपा हा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणार पक्ष असून, या मतदारसंघात उद्योगनिर्मिती करुन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहचवण्यासाठी आता सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे.
याप्रसंगी फैय्याज मुल्ला, निजाम मुल्ला, जमीर शेख, जमीर डांगे, अमीर अत्तार, इन्नुस मुजावर, अल्ताफ शिकलगार यांच्यासह मुस्लिम समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
‘वंचित, अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी सदैव कटीबद्ध’
RELATED ARTICLES