कराड: महात्मा बसवेश्वर यांच्या विचारावर प्रेम करणारा लिंगायत समाज हा तत्वनिष्ठ समाज आहे. कराड तालुयात हा समाज मोठा असून, शहर व परिसरातील जडणघडणीत समाजाचा मोलाचा वाटा आहे. येत्या काळात कराडमध्ये बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही भाजपा-शिवसेना महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. कराड येथे लिंगायत समाज बांधवांच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक महेश कांबळे, सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवानंद डुबल अध्यक्षस्थानी होते.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, लिंगायत समाजाची शिस्तप्रियता मला ज्ञात आहे. समाजसेवेचा दिखावा करणे त्यांना आवडत नाही. त्यांचा हा गुण सर्व समाजाला प्रेरणादायी आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न शासनस्तरावर सोडविण्यासाठी मी पाठपुरावा करेन. तसेच कराड व मलकापूर येथील लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. त्यांच्या रूपाने जनतेचा प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असून, कराड दक्षिणमधील लिंगायत समाजबांधवांनी अतुलबाबांना भक्कम पाठिंबा द्यावा.
उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील म्हणाले, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराडच्या विकासाला हातभार लावला आहे. कराड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी कराडकरांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे. कार्यक्रमास राजेंद्र घाटे, संजय शेटे, बंडा गुजर, दिलीप चिंचकर, नितीन मोरे, सुरेश घुणकी, नंदाताई विभूते, अभय गवळी, सुनील महाजन, सुभाष तेली, गजानन फल्ले, राजीव खालीपे, राहुल तावसे, स्नेहा तोडकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराडमध्ये बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहू: डॉ. अतुलबाबा भोसले
RELATED ARTICLES