रेठरे बुद्रुक: रेठरे बुद्रुक येथे भर पावसात अतुलबाबा विरोधकांवर अक्षरशः बरसले. प्रचंड पाऊस पडत असतानाही भर पावसात भिजत अतुलबाबांनी जोरदार भाषण केले. मला सत्तेसाठी निवडणूक लढवायची नाही. तर मला लोकांच्या सेवेसाठी सत्ता पाहिजे. उद्या आपल्या भागातला माणूस मुंबईला गेला तर त्याला छातीठोकपणे तिथे फिरता आले पाहिजे, त्या सामान्य माणसाची कामे मार्गी लागावीत ही अपेक्षा आहे. त्यावेळी य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, म्हाडा चे संचालक आनंदराव मोहिते, जि. प. सदस्या श्यामबाला घोडके, सरपंच सुवर्णा कापूरकर, पैलवान धनाजी पाटील, सचिन पाचूपते, व्ही. के. मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अतुलबाबा म्हणाले की, भाजपा सरकारमुळेच आज राज्यात आदर्श ठरलेली रेठरे गावाची पाणी योजना साकारली गेली. आपल्या आशीर्वादामुळेच मला पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळाली. यशवंतराव मोहिते भाऊंच्या रूपाने रेठरे गावाने महाराष्ट्राला वैचारिक नेतृत्व दिले आहे. भाऊंनी अनेक पुरोगामी कायदे केले. तर जयवंतराव भोसले अप्पांनी सहकाराचे जाळे निर्माण करत या भागात समृद्धी आणली.कृष्णा परिवारामुळे हजारो सामान्य लोकांना संधी मिळाली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कराड दक्षिणेत कमळ फुलविण्याचे आवाहन केले आहे. कराडकर नक्कीच याला दाद देतील याची मला खात्री आहे. मला विजयी करा, माझी सर्व पदप्रतिष्ठा तुम्हाला समर्पित करीन.
या भागातील सामान्य माहिती माहिती नसलेली व्यक्ती आमदार म्हणून निवडून दिल्यावर काय होते हे आपण गेल्या 5 वर्षात पाहिले आहे. कुठल्या भागात गेल्यावर काय बोलायचे हे त्यांना लोकांना सांगावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते काय?
मदनराव मोहिते म्हणाले की, कृष्णा कारखान्यात अपघाताने चेअरमन झालेल्या एकाने 95 दिवस जेलमध्ये जाण्याचा विक्रम केलाय. असल्या लोकांच्या टिकेल आम्ही भीक घालत नाही. कराड दक्षिणमध्ये अतुलबाबांच्या प्रयत्नातुन आणि भाजपा सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आला, पण तो निधी मीच आणला असा डांगोरा विद्यमान आमदार पिटत आहेत. तसं आता आम्हीही तुमचा पराभव आमच्यामुळेच झाला, हे आता 4 दिवसांनंतर सांगणार आहोत, हे लक्षात ठेवा.उद्या तुम्ही पराभूत व्हाल, तो दिवस सामान्य नागरिकांसाठी आनंदाचा दिवस असेल.
डॉ. सुरेश भोसले यावेळी बोलताना म्हणाले की, विकासाची परंपरा कायम सुरू ठेवण्यासाठी अतुलबाबांना मत द्या. आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी भाजपाला भरघोस मतांनी निवडून द्या.
भर पावसात अतुलबाबा विरोधकांवर बरसले
RELATED ARTICLES