कराड: कराड शहरामध्ये डेंग्युचे रूग्ण आढळल्याने कराड नगरपालिकेच्या वतीने डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर 40 जणांच्या वेगवेगळया टिमद्वारे जनजागृती केली जात असुन शहरातील डेंग्यू सदृश्य ठिकाणांचा सर्व्हे करण्यात येत आहे. शहरात एकुण 55 ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले असुन एलईडी स्क्रिनद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
कराड शहरामध्ये डेंग्यूच्या आजाराने नुकताच एका बालिकेचा दुर्देवी अंत झाला. तर तीन महिन्यांमध्ये शहरात दोन लहान मुलींसह तिघांना जीव गमवावा लागला आहे. यंदा झालेल्या महापुरामुळे ही साथ पसरली असुन वेळीच खबरदारी न घेतल्यामुळे शहरात डेंग्यूने अनेकजण आजारी आहेत तर काहींना प्राणास मुकावे लागले आहे.
यासंदर्भात पालिकेच्या वतीने बुधवारी डेंग्यु प्रतिबंधासाठी कार्यशाळा घेण्यात आली. तर डेंग्यू संदर्भात नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासाठीच्या माहिती देण्यात येत आहे. यासाठी 20 अशा स्वयंसेविका तसेच पालिकेचे 10 कर्मचारी याची माहिती देत आहेत. तर ग्रिनी द ग्रेट टिमकडुन 10 कर्मचारी घरोघरी फिरून माहिती देत आहेत. तसेच शहरामध्ये माहिती पत्रके वाटली जात आहेत. फॉिंगंग मशिनद्वारे सर्वत्र औषध फवारणी करण्यात येत आहे. यासाठी टिम तयार करण्यात आली आहे.
ही टिम पहाटे व सायंकाळी शहरात दररोज औषध फवारणी करत आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही शहरात फिरून माहिती देत आहेत.
डेंग्यू प्रतिबंधासाठी पालिका अलर्ट
RELATED ARTICLES

