Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकराड येथे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कारचे दि.25 रोजी.वितरण

कराड येथे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कारचे दि.25 रोजी.वितरण

कराड: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी प्रा.एन.डी.पाटील यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी 25 नोव्हें. रोजी येथील सगाम महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वा. मुंबई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम 2 लाख, मानपत्र असे आहे. तसेच यावेळी राजहंस प्रकाशन निर्मित राम खांडेकर लिखित सत्येच्या पडछायेत या पुस्तकाचे प्रकाशन ही होणार आहे. अशी माहिती येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान के्रदाचे अध्यक्ष आ.बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुंबई प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताबाळ सराफ, प्रा.पोळ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृतिक कला क्रिडा या क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगीरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सन. 1990 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सन.2019 चा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा.एन.डी.पाटील यांना जाहिर झाला आहे. त्याचे वितरण दि.25 रोजी कराड येथील सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. या कार्यक्रमास राम खांडेकर, न्या.वाय.व्ही.चंद्रचुड, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular