Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीराजस्थानच्या ग्रामीण संस्कृतीवरील अनुष्का वरेकर यांचे जहांगीरमध्ये चित्रप्रदर्शन

राजस्थानच्या ग्रामीण संस्कृतीवरील अनुष्का वरेकर यांचे जहांगीरमध्ये चित्रप्रदर्शन

कराड: येथील नव्या पिढीतील ख्यातनाम चित्रकार अनुष्का वरेकर यांचे राजस्थानी लोकजीवन आणि संस्कृतीचा वेध घेणार्‍या चित्रमालिकेचे प्रदर्शन सोमवार दि. 25 रोजी मुंबईच्या जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आले आहे.
सामान्य राजस्थानी माणसांच्या आयुष्याचा रंग खडतर, राखाडी असला तरी त्यांनी आपले आयुष्य रंगारंग केलेले आहे. या विचाराने संपूर्ण राज्याचा प्रवास करून अनुष्का वरेकर यांनी चित्रांची एक विस्तृत मालिका बनवली आहे. ज्याचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात होत आहे. दि.25 नोव्हेंबर ते दि.1 डिसेंबर या काळात 11 ते 7 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे.
राजस्थानी लोक संस्कृती, उत्सव, आनंदाचे आणि कष्टाचे क्षण, स्त्री पुरुष, त्यांची आभूषणे, पोशाख, वाळवंट, उंट, त्यांची सजावट अशा विविध बाबींचा विचार करून ते रंगारंग ग्रामीण जीवन आपण कॅनव्हास वर उतरवले आहे. त्यासाठी आकर्षक रंगांचा मुक्त वापर करण्याची भारतीय ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे, जी.एस.माजगावकर यांची परंपरा आणि प्रेरणा घेऊन आपण काम केले असल्याचे अनुष्का वरेकर यांनी सांगितले. राजस्थान ही राजेरजवाडे यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहेच पण तिथल्या सामान्य माणसांचं आयुष्यही तितकंच मूल्यवान आणि प्रेरक भासल्याने त्यांच्या आयुष्याचे रंग कॅनव्हास वर उतरवणे आनंद दायी होते. असे त्या सांगतात.
2016 सालीही त्यांना जहांगीर कला दालनात चित्र प्रदर्शनाचा बहुमान मिळाला होता.
नुकतेच नेहरू आर्ट सेंटर मधील त्यांचे प्रदर्शनही चित्रकला रसिकांच्या कौतुकास पात्र ठरले होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular