कराड: देशात ग्रामीण विभागातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचून शाश्वत ग्रामविकासासाठी नाबार्डच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांत सहभागी होवून ग्रामीण विकासासाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून काम करण्याची स्वंयसेवी संस्थांना चांगली संधी असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे सातारा जिल्हा व्यवस्थापक सुबोध अभ्यंकर यांनी केले.
सातारा येथील आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत नाबार्ड च्यावतीने आयोजित स्वंयसेवी संस्था पदाधिकार्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते.
यावेळी आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक सिध्दनाथ बाबर, बँक ऑङ्ग महाराष्ट्र अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक गिरिश पई, नँबङ्गिन्सचे सातारा जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुबोध अभ्यंकर यांनी नाबार्ड च्या विविध योजना आणि प्रकल्पांची माहिती देत स्वयंसेवी संस्थांनी नाबार्ड बरोबर काम करण्यासाठी आवश्यक पात्रतेविषयी माहिती दिली.
सर्व संस्थांनी संघटीत राहून एकमेकांना सहकार्य केल्यास अनेक योजना आणि उपक्रम प्रभावीपणे यशस्वी होण्यास मदत होते, असेही अभ्यंकर यांनी सांगितले.
यावेळी सिध्दनाथ बाबर, महादेव शिरोळकर, गिरिश पई व नरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित संस्था प्रतिनिधींनी आपल्या संस्थांची माहिती दिली.
शाश्वत ग्राम विकासासाठी नाबार्ड बँकेसमवेत स्वयंसेवी संस्थांना संधी : सुबोध अभ्यंकर
RELATED ARTICLES