Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीबेकायदेशीर दगड उत्खननाबाबत कालगाव ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर दगड उत्खननाबाबत कालगाव ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक

कराड: कालगाव (ता.कराड) येथील गायरान गट नंबर 323 मध्ये बेकायदेशीर दगड उत्खनन होत असून. त्याबाबत वारंवार महसूल अधिकारी यांच्याशी ग्रामपंचायतीने संपर्क साधून माहिती दिली आहे. परंतु संबंधित बेकायदेशीर उत्खनन करणारा व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे संबंधित खाणचालक मोकाट सुटला असून महसूल विभागाच्या अभयामुळे या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन होत असून दोषींवर कारवाई झाली नाही तर यापुढे ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही व ग्रामपंचायत कोणतेही सहकार्य करणार नाही असा इशारा कालगाव ग्रामपंचायतीचा पदाधिकार्‍यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी उपसरपंच महेश चव्हाण म्हणाले,मौजे कलगाव गायरान गट नंबर तीनशे तेवीस मध्ये दगड उत्खनन केले बाबत तलाठी कालगाव यांना फोन वरून दि.21 नोव्हेंबर रोजी कालगाव ग्रामपंचायत दक्षता समिती अध्यक्ष सरपंच संगीता भास्कर चव्हाण, सदस्य विशाल मोहिते, पोलीस पाटील अमित वारे, तलाठी नंदकुमार शिंदे, मंडलाधिकारी कोळेकर यांनी जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा तेथे दगड उत्खनन फोडलेले दिसले परंतु तेथे कोणीही व्यक्ती किंवा जागेवरती आढळले नाही किंवा सापडली नाही त्यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर व प्रत्यक्ष तहसीलदारांची भेट घेतल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर ती गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
22 नोव्हेंबर रोजी मसूर पोलीस दूर क्षेत्राचे प्रभारी मयेकर व त्यांचे सहकारी यांनी जागेवर जाऊन समक्ष जागेची पाहणी केली असता दगड पडलेले आढळले त्यावेळी पोलिसांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना कल्पना दिली व त्यांनी 23 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांना समक्ष भेटण्यासाठी बोलावले तेव्हा मळेकर यांनी सरपंच उपसरपंच यांना विचारणा केली यामागे कोण आहे किंवा नाव माहित आहे का अज्ञात व्यक्तीवर ती गुन्हा नोंद करता येणार नाही तेव्हा उपसरपंच महेश चव्हाण यांनी सांगितले की या अगोदर दोन महिन्यापूर्वी याठिकाणी गायरान गट नंबर 323 मध्ये उत्खनन झाले होते. त्यासाठी मंडळ अधिकारी यांना फोन करून सरपंच समक्ष ग्रामसेवक यांना बोलावले होते. त्या ठिकाणी पोलीस पाटील अगोदर उपस्थित होते. त्यांनी सर्कल यांचे सांगण्यावरून निळ्या रंगाचा नवीन ट्रॅक्टर व एक ट्रॉली डबल भरलेला पडलेला होता नंतर मंडळाधिकारी कवठे या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांची चर्चा झाली नंतर पोलीस पाटील अमित वारे यांना सरकार यांनी सदरील ट्रॅक्टर ट्रॉली तुला घेऊन यायला सांगितलं व सदरील ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसाला तहसीलदार ऑफिस चौकातून सोडून मालकाच्या ताब्यात दिला सदर मालक मोहन महाडिक व बाळासो शामराव महाडिक यांना सरपंच यांनी चौकशी केली असता ट्रॅक्टर कसा सोडला त्यांनी सांगितले की सर्कल कोळेकर यांना दहा हजार रुपये देऊन सोडला तेव्हा पूर्वीही ग्रामपंचायतीने मोहन शामराव महाडिक यांना नोटीस द्वारे कळविले होती तरी त्यांनी नोटीस स्वीकारली नव्हती या गट नंबर मध्ये ग्रामपंचायतीने दोन वर्षापासून कोणालाही कसलीही उत्खननाची परवानगी दिलेली नाही.
ग्रामपंचायत महसूल विभागात पूर्ण सहकार्य करत आहे उत्खनन करणार्‍या व्यक्तीला विभाग पाठीशी घालत असून संबंधित व्यक्ती व अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी ग्रामपंचायतीस याबाबत दोषी धरण्यात येऊ नये अशी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी सरपंच संगीता भास्कर चव्हाण, सदस्य सुरेश आनंदराव चव्हाण, महेंद्र माने, दत्तात्रय तावरे, रूपाली कुंभार, सोनाली चव्हाण, धनश्री चव्हाण, सुरेखा माने, सीमा माने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular