Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीस्वयंचलित पथदिव्यांद्वारे कराड पालिकेची बचत कराड शहरातील 154 युनिटची यंत्रणा कार्यान्वित

स्वयंचलित पथदिव्यांद्वारे कराड पालिकेची बचत कराड शहरातील 154 युनिटची यंत्रणा कार्यान्वित

कराड: शहरातील सुमारे 154 पथदिव्यांच्या युनिटला स्वयंचलित (चालू-बंद होण्याची) यंत्रणा नगरपालिकेने बसवली आहे. ती आजपासून प्रत्यक्षपणे कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या वार्षिक सुमारे सहा लाखांच्या खर्चाची बचत होणार आहे. नगरपालिकेकडून एलईडी पथदिवे बसवण्याचे काम झाले आहे. त्यावर एकाचवेळी बंद-चालू करणारी स्वयंचलित (सीसीएमएस) यंत्रणा बसवण्यात आली. त्यामुळे शहरातील पथदिवे एकाचवेळी बंद-चालू होणार आहेत.
पालिकेच्या या कामाचे उद्घाटन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, गटनेते राजेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंत पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, पाणीपुरवठा सभापती अर्चना ढेकळे, अतुल शिंदे, किरण पाटील, शारदा जाधव, सुप्रिया खराडे, आशा मुळे, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए.आर.पवार, अभियंता रत्नाकर वाढई, इलेक्ट्रिकल अभियंता धन्वंतरी साळुंखे उपस्थित होत्या.
श्री. वाटेगावकर म्हणाले, शहरातील पथदिवे बंद-चालू करण्यासाठी वार्षिक सहा लाख रुपयांचे टेंडर देण्यात येते. मात्र, स्वयंचलित सीसीएमएस यंत्रणा बसवल्याने टेंडरचा खर्च वाचणार आहे. पथदिवे बंद-चालू करण्यासाठी कर्मचार्‍यास प्रत्येकवेळी दीड तासाचा वेळ लागत होता. तेही काम एका बटणावर होणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे.
सध्या वापरात असलेल्या उपकरणांची कार्यक्षमता कमी असल्याने विजेचा अपव्यय होतो. तर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरांचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत असते. ही प्रक्रिया निरंतरपणे सुरु राहणारी आहे. यामुळे वीजध्ऊर्जा बचत, ऊर्जेचा कायमस्वरुपी स्त्र्रोत म्हणून अस्तित्वात राहणार आहे. ऊर्जा संवर्धन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापित ब्यूरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीच्या अहवालानुसार क्षेत्रात ऊर्जा बचतीस वाव आहे.
शासनाचे ऊर्जा संवर्धन धोरणानुसार पथदिवे बसविताना फक्त एलईडी बसविणे बंधनकारक आहे. शहरामध्ये तसे पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर शहरातील स्ट्रीट लाइट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होण्यासाठी ईइएसएल कंपनीतर्फे स्वयंचलित यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले आहे. सगळ्या शहरांमध्ये ती यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यावेळी शहरातील स्ट्रीट लाइट एकाच वेळी चालू व बंद होणार आहेत. यामुळे स्ट्रीट लाइट बिलांमध्ये आणखी बचत होणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular