कराड: येथील नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) मित्रपरिवार आयोजित स्वातंत्र्य सेनानी स्व. गंगाराम केशवराव तथा भाई गुजर यांच्या स्मृतिप्रित्यार्थ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत धनंजय चिंचकर, स्पोर्टस क्लब कराड यांनी प्रायोजक केलेल्या रायगडच्या उमेर इलेव्हन संघाने भाई गुजर प्रथम क्रमांकाचा चषक व 1 लाख 75 हजार रूपयांचे बक्षिस मिळविले.
बनवडी (ता. कराड) येथील दौलतराव आहेर कॉलेजच्या मैदानावर सलग सहाव्या वर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध राज्यातील 28 संघानी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत शंकरराव खापे- बापू इलेव्हन बनवडी यांचा प्रायोजक असणार्या प्रतिक इलेव्हन, पुणे यांनी दुसर्या क्रमाकांचे 89 हजार 130 रूपये व भाई गुजर चषक पटकावला. तृतीय क्रमांक चंद्रकांत मोरे व सागर थोरात यांच्या सॅण्डी एसपी, मुंबई संघाने व उत्तेजनार्थ अमितराज उंडाळे यांच्या संघाने प्रत्येकी 10 हजार व चषक पटकाविला.
स्व. भाई गुजर टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी नगरसेवक इंद्रजित गुजर, युवक काँग्रेस संघटक राहूल चव्हाण, कॉग्रेस शहराध्यक्ष राजेंद्र माने, फारूख पटेवगार, शंकरराव खापे, पोपटराव साळुंखे, राजेंद्र शिंदे, राजू जाधव, राजेंद्र पवार, विनायक पवार, प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला, उपप्राचार्य हणमंत कुंभार, मारूती कांबळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन प्रा. आयुब कच्छी, पप्पू मोडगिरी, किरण पवार, राजेंद्र दळवी यांनी केले. पंच म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या कल्याणी घोरपडे व त्यांच्या टीमने काम पाहिले. अक्षय चिबडे आणि टीमने टेनिस क्रिकेट युट्युब वरती लाईव्ह प्रसारणाचे काम केले. क्रिकेट सामन्यांचे सूत्रसंचालन मनोज बेल्लेकर, प्रशांत अदवडे यांनी केले.
जुन्या क्रिकेटपटूंचा सत्कार
नगरसेवक इंद्रजित गुजर हे कॅप्टन नावाने परिचित आहेत. श्री. गुजर यांचे क्रिकेट खेळावर अत्यंत प्रेम असल्याने ते आपले आजोबा स्वा. से. स्व. भाई गुजर यांच्या स्मरणार्थ गेले सहा वर्ष राज्यस्तरीय स्पर्धा राबवत आहेत. तसेच नवनविन खेळांडूना संधी देत असतात. त्याचबरोबर जुन्या खेळांडूनी आपला काळ गाजवलेला असतो, म्हणून अशा क्रिकेटपटूंचा स्पर्धेच्यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कराडला होणार्या या राज्यस्तरीय स्पर्धा या क्रिकेटप्रमेंसाठी पर्वणीच ठरत आहेत.
स्वा.से.स्व.भाई गुजर चषक रायगडच्या उमेर इलेव्हनने पटकावला
RELATED ARTICLES