कराड: पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी कश्मीर येथे सी.आर.पी.एफ.च्या जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यांच्या या कृत्याचा येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवुन पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली. तसेच दहशतवाद्यांना खतपाणी घालणार्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान याच वेळी मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली.
दत्तचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर आज शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने एकवटले होते. त्यंानी पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांचा तीव्र निषेध नोंदविला. तसेचे दहशत वाद्यांना खतपाणी घालणार्या पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. शिवसेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक कराड तालुका प्रमुख नितीन काशिद, शहर प्रमुख शशिकांत करपे, शशिकांत हापसे, तात्यासाहेब जाधव राजेंद्र माने, संजय गायकवाड, या शिवसेनेच्या पदाधिकार्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या कृत्याचा शिवसेनेकडून निषेध
RELATED ARTICLES