कराड : मोदी सरकारला सर्व आखाडयावर अपयश आले आहे. सत्तेतील काही मित्रपक्षांनी त्यांच्यापासुन फारकत घेतली आहे. शेवटचा प्रयोग म्हणुन काही मित्र पक्षांनी भाजप सोबत युती केली आहे. महाराष्ट्रात युती करणार नसल्याच्या डरकाळया फोडणार्या शिवसेनेने माघार घेत युतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे. अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यंानी व्यक्त करून लोकसभेच्या होणार्या निवडनुकीत सत्तांतर हे अटळ असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी आ. आनंदराव पाटील मलकापुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले कोणतेही सरकार आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच बजेट सादर करते मात्र मोदी सरकारने हा संकेत मोडुन बजेट सादर केले आहे. या सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये त्यांनी दिशाभुल करणार्या तरतुदी करून जनतेची दिशाभुल केली आहे. काँगे्रसच्या राज्यात गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र त्या किमती मोदी सरकारच्या काळात गगनाला भिडल्या मोदी सरकाने गॅस, पेट्रोल, डिझेलच्या माध्यमातुन जनतेची आर्थिक लुट केली आहे.
जम्मू-कश्मीर येथील पुलवामा येथे अतिरेक्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला. देशाचे पंतप्रधान मोदी यंानी हल्लेखोरांच्या विरोधात कडक भुमिका घेण्याचे जाहिर केले त्यास काँगे्रस पक्षाचा पुर्ण पाठिंबा आहे. मात्र पंतप्रधान मोदी यंानी कारवाईच्या पुढील निर्णयाचे अधिकार सैन्य दलाला दिल्याचे म्हटले आहे. ते घटनेला धरून नाही. कारवाईचा निर्णय पंतप्रधान व संरक्षण कमिटीने घ्यावयाचा असतो. तेंव्हा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वक्तव्यात दुरूस्ती करावी. असे म्हणुन आ. चव्हाण यांनी भाजप सरकारने सीबीआय सर्वोच्च न्यायालय व इतर महत्वाच्या संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप केला आहे.असाही आरोप केला.
महाराष्ट्रात मोठी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र राज्य शासन याबाबत गंभीर नाही. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंाच्या स्मारकांबाबत सरकार धरसोडीचे धोरण अवलंबीत आहे. राज्यात शेतीमालाच्या उत्पन्नात घट झाली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. एकुनच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.जनताही सरकारच्या विरोधात आहे. हे येणार्या लोकसभा निवडणुकीत सिध्द होईल.
लोकसभेच्या निवडणुकीत सत्तांतर अटळ : आ. पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES

