कराड: नुकत्याच संपलेल्या सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये कृष्णा सहकारी बँकेला 11 कोटी 26 लाख 75 हजार रूपये एवढा ढोबळ नफा झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बँकेच्या ढोबळ नफ्यात 3 कोटी 45 लाख 32 हजार रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या 31 मार्च 2019 अखेरच्या एकूण ठेवी 314 कोटी 16 लाख रूपयांच्या असून, 201 कोटी 17 लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 515 कोटींच्या वर झाला असून, बँकेच्या सी.डी. रेशोचे प्रमाण 64.04 टक्के आहे. त्याचप्रमाणे बँकेचा ढोबळ एन.पी.ए. 5.30 टक्के असून, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. बँकेचे एकूण भागभांडवल 561 कोटी असून, 344 कोटींहून अधिक स्वनिधी शिल्लक आहे. तसेच 144 कोटींची गुंतवणूक आहे.
तसेच बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुविधा, एस.एम.एस. बँकींग, ई-कॉमर्स, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., एन.ए.सी.एच्. यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यात 17 शाखांच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देणार्या या बँकेने गेल्या आर्थिक वर्षात कराड येथील मार्केट यार्ड व उंब्रज येथे दोन नवीन शाखा सुरू केल्या असून, बँकेने सुरू केलेल्या एटीएम सेवेचा लाभही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. बँकेच्या ठेवी व कर्जयोजनांचा तसेच अन्य सुविधांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.
कृष्णा बँकेला 11 कोटी 26 लाखांचा ढोबळ नफा: ना.डॉ.अतुल भोसले
RELATED ARTICLES