Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीश्री.छ.उदयनराजे यांना विक्रमी मताधिक्य द्या:आ.पाटील

श्री.छ.उदयनराजे यांना विक्रमी मताधिक्य द्या:आ.पाटील

कराड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवारसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्य देवून, पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचे आवाहन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या देशमुखनगर ता. जि. सातारा विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनंजय शेडगे, सह्याद्री सहकारी कारखान्याचे संचालक पै.संजय कुंभार, पै.संजय थोरात, भास्कर गोरे, पाल गावचे सरपंच जगन्नाथ पालकर, उद्धवराव फाळके, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे, रवींद्र कदम, मनोहर घाडगे, मार्केट कमिटीचे उपसभापती नितीन कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रामभाऊ जगदाळे, रमेश कदम व ढाणे बापू यांनी मनोगत व्यक्त करताना, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देणार असल्याची पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने ग्वाही दिली.
आ.बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, बोलणे जास्त व काम कमी अशी या सरकारची अवस्था आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अच्छे दिन च्या नावाखाली सवंग लोकप्रियतेसाठी खोट्या घोषणा करून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेची घोर निराशा केली असून, जनतेने अशा भूलथापांवर विश्वास ठेवू नये.
याप्रसंगी सुत्रसंचालन सातारा पंचायत समितीचे सदस्य प्रवीण धस्के केले, प्रास्ताविक भरत देशमुख यांनी केले, तर शिक्षक बँकेचे माजी संचालक गणपतराव घाडगे यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular