कराड: शिक्षणाचे व्यावसायिकरण झाले आहे, अशी ओरड सुरू असताना शिक्षण संस्थांनी मात्र हा व्यवसाय अधिकाधिक भरभराटीला नेण्याचा उद्योग सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळंानी आपले शैक्षणिक फी वीस हजाराच्या घरात नवून ठेवली आहे. त्यामुळे पालकांना घाम फुटला असुन सर्वांसाठी शिक्षण या शासनाच्या आदेशालाच संस्थाचालकांनी केराची टोपली दाखवली आहे.
गुढीपाडव्यापासुन प्ले ग्रुप व पहिलीच्या वर्गाचे प्रवेश सुरू होतात. याचा फायदा उठवत संस्था चालकांनी या वर्षी पासुन शैक्षणिक फीमध्ये भरमसाट वाढ केल्याचे दिसुन येते आहे. कराड शहरासह निमशहरी भागात शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यातच इंग्रजीचे फॅड आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी पालक आपल्या पाल्यासाठी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य देताना दिसत आहे. याचा पुरेपुर फायदा संस्थाचालकांनी उठवला आहे.
यावर्षी प्ले ग्रुपची फी काही शाळांमध्ये पंधरा हजार, काही शाळंामध्ये सतरा हजार तर काही शाळांमध्ये ती वीस हजारांवर आहे. फीचे आकडे पाहुन सामान्य पालकांना घाम फुटला असुन येवढी फी भरणे त्याला शक्य नाही. त्यामुळे इच्छा असुनही ते आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
पहिली ते आठवी पर्यंतची वार्षिक फी पंचवीस ते चाळीस हजार येवढी आहे. सीबीएससी पॅटर्न असेल तर मग बोलायलाच नको. इंग्रजी शिक्षण सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, अशी ओरड सुरू असताना त्याला बळकटी देण्याचे काम शिक्षण संस्थांकडुन सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे.
सर्वांसाठी शिक्षण, शिक्षण हक्क कायदा असे महत्वपुर्ण शैक्षणिक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले असले तरी खासगी शिक्षण संस्थामधील शैक्षणिक फीवर मात्र सरकार नियंत्रण आणू शकलेले नाही. त्यामुळे या शैक्षणिक धोरणांचा शिक्षण संस्था चालकांवर काही परिणाम झाल्याचे दिसुन येत नाही. पालक वर्गातुन मात्र याबाबत चिंता व्यक्त होताना दिसत आहे. शिक्षण विभागाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.
प्ले ग्रुपच्या फीचे आकडे पाहुन पालक घामाघूम
RELATED ARTICLES

