मसूर: कोणेगांव ता.कराड येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला पिरसाहेब (जानशावली बाबा) उरूस शुक्रवार दि.12 रोजी संपन्न होणार आहे. अतिशय जागृत देवस्थान असलेल्या या उरूसादिवशी गावातील हिंदू-मुस्लिम धर्मातील स्त्री-पुरूष भक्तीभावाने रोजा करतात अशी येथील ही अखंड परंपरा आहे. दिवसभर धरलेला रोजा दुपारी 4 नंतर पीरसाहेबांचे दर्शन घेवून त्याच ठिकाणी सोडतात. या जानशावली बाबांच्या उत्सव मिरवणूकीत हिंदू-मुस्लिम बांधव मोठया संख्येने सामील होत असतात.
नवसाला पावणारा पीर अशी ख्याती असलेल्या या उरूसाचे आगळे-वेगळे वैशिष्टये म्हणजे या गावातील सासरी गेलेल्या सर्व मुली व वयोवृध्द महिलाही उरूसाला अवर्जून उपस्थित राहतात. या वेगळेपणाची आजही मोठया भक्तीभावाने जपणूक केली जात आहे.
उरूसादिवशी गावापासून कृष्णानदीतीरी सुमारे दोन कि.मी.अंतरावर असलेल्या जानशावली पीरसाहेबांच्याकडे जाणारा रस्ता चारचाकी, दुचाकी वहाने, बैलगाडया व पादचारी यांच्या गर्दीने ङ्गूलुन गेलेला असतो. यादिवशी पीरसाहेब परिसर खेळण्याची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, मेवामिठाईची दुकाने ,ङ्गिरते व्यापारी यांच्या गर्दीने खुलून जातो.
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गाह उरूस कमिटीच्या वतीने शौकत शेख, इस्माईल शेख, बशीर शेख, जमीर शेख, मन्सूर शेख, सलीम शेख, गौस शेख, अमानुल्ला मुल्ला, आलमशा शेख, जहाँगीर शेख जमीर शेख,मन्सूर शेख, इस्माईल शेख,जावेद शेख,रिजवान शेख तसेच सर्व मुस्लिम बांधव मनोभावे पूजा करतात.
तरी या उरूसाला कोणेगांवसह सातारा जिल्हयातील भावीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणेगांव येथे शुक्रवारी पिरसाहेब (जानशावली बाबा) उरूस
RELATED ARTICLES