कराड: येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये सेवानिवृत्त होणार्या शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचा सत्कार समारंभ प्रमुख पाहुणे वैशाली राजमाने, तहसिलदार, सातारा यांच्या हस्ते संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने हे होते. यावेळी सेवानिवृत्त प्रा.मेजर रवींद्र रणखांबे, प्रा.डॉ. भिमराव पाटील, प्रा. भगवान मोहिते, प्रा.डॉ.सुभाष पवार, प्रा.राजेंद्र इंगोले, प्रा.उर्मिला जगदाळे, प्रा.पुष्पा पानसकर, प्रा. अरूणा पाटील व दिलीपकुमार पाटील विभागाचे डी. वाय.एस. पी. मुजावर साहेब, डॉ.संजय पानसकर, डॉ.के. पी. माळी, प्रा. सुमंत जगताप प्रा.दत्तात्रय रैनाक, अॅड. सदानंद चिंगळे, प्राचार्या डॉ.प्रज्ञा पाटील, अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे वैशाली राजमाने म्हणाल्या की, शिक्षकाच्या आयुष्याचे संचित काय असेल तर ते कुटुंब आणि हितचिंतक आहे रयत शिक्षण संस्था हा एक परिवार आहे. त्यामुळे प्रत्येक सेवक झोकून देऊन काम करतो. सर्व रयत सेवक दिलेल्या शाखेमध्ये सर्व सेवक दिलेल्या शाखेमध्ये अविरत झटुन काम करत असतो. तुमची सेवानिवृत्ती नसुन आता खर्या अर्थाने जगण्याची आवृत्ती सुरू झाली आहे.
मा.प्राचार्य डॉ. मोहन राजमाने अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणालेे की, रयत सेवकांच्या सेवानिवृतीमुळे महाविद्यालयामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये या सर्व सेवकांचे मोठे योगदान आहे.
यावेळी आर.वाय. गायकवाड, प्रा.एन.आर. सुर्यवंशी, उपप्राचार्य आर.बी. पाटील, प्रा.जे.पी. काळे, उपप्राचार्य आर.वाय. पाटील, रिधीमा रणखांबे, रोहन रणखांबे, कौस्तुभ पाटील, प्राचार्य डॉ.प्रज्ञा पाटील, डॉ.भास्कर यादव, सौ.अवंती, प्रा. रामकृष्ण पानसकर, पूजा थोरात, अरविंद पाटील, प्रा. संध्या पाटील, रवींद्र काकडे, बरकत मुजावर, ए. एन. फासे, हेमलता ढाणे, सुहास कांबळे,जे.ए.पाटील, डॉ. सुहास कांबळे, जे.ए. पाटील, डॉ. सुनंदा पाटील, विकी सोनवणे, प्रमोद रणखांबे, अॅड. सदानंद चिंगळे, श्री. विलास चव्हाण, डॉ. संजय पानसकर, प्रा. व्ही. के. निकम, प्राचार्य आर. आर. कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. मेजर रवींद्र रणखंाबे, प्रा. डॉ भिमराव पाटील, प्रा. भगवाना मोहिते, प्रा.डॉ.सुभाष पवार, प्रा. राजेंद्र इंगोले, प्रा. उर्मिला जगदाळे, प्रा.पुष्पा पानसकर, प्रा. अरूणा पाटील पाटील व दिपीपकुमार पाटील या सत्कारमुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य डॉ. एस. आर. सावंत यंानी केले यावेळी सत्मारमुर्तींचे हितचिंतक, आप्तेष्ट, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्र संचालन प्रा. डॉ. रेश्मा दिवेकर, प्रा.डॉ. अश्विनी तातुगडे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.एस.ए. पाटील यांनी मानले.
स.गा.म. कॉलेजमध्ये सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न
RELATED ARTICLES