शिवनगर: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांनी कामगारांना कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची शपथ दिली. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जगताप व कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, डिस्टलरीचे सहाय्यक सरव्यवस्थापक प्रतापसिंह नलवडे, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सुरक्षा अधिकारी संपतराव पाटील, वाहतूक अधिकारी गजानन प्रभुणे, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, कायदेशीर समन्वयक सुभाष कुलकर्णी, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख, सॅनिटरी इन्स्पेक्टर व्ही. जी. पवार, गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ कामगार नेते श्रीराम राजहंस, बी. आर. थोरात, मोहन शेटे, अजित पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
कृष्णा कारखान्यावर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES