मल्हारपेठ: मारुल हवेलीच्या कुस्ती आखाड्यात पुणे चा पैलवान संतोष पडळकर ने कुंडलच्या पैलवान संदीप बोराटे यास चितपट करून एक्कावन हजाराचे इनाम जिंकले. मारुल हवेली चे ग्रामदैवत श्री निनाई देवी च्या यात्रेनिमित्त हा कुस्ती आखाडा चे आयोजन केले होते. कुस्ती आखाड्याचे उदघाटन व बक्षीस समारंभ सिक्कीम चे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश अध्यक्ष सारंग पाटील यांच्या हस्ते झाले.
या भव्य कुस्ती आखाड्यातील द्वितीय क्रमांक ची कुस्ती कराड चा पैलवान अक्षय मोहिते व पुणे चा पैलवान अमित गायकवाड यांच्यात अटीतटीच्या लढतीत पैलवान अक्षय मोहिते विजयी झाला. यावेळी यात्रा कमितीतर्फे एक हजार इनामच्या पन्नास हुन अधिक कुस्त्या झाल्या.या कुस्ती मैदानात पैलवानांनि एकेरी पटाची चढाई घुटना घिसा धोबीपछाड मोळी बांधणे. आशा विविध डावा चे दर्शन घडविले व कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले कुस्ती निवेदक ईश्वरा पाटील यांनी रंगतदार कुस्ती समालोचन केले सातारा पुणे सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून अनेक पैलवान या कुस्ती आखड्यासाठी उपस्थित होते.
यात्रेतील सर्व धार्मिक कार्यक्रम छबिना पालखी सोहळा व कुस्ती आखाडा यशस्वी होणेसाठी यात्रा कमिटी चे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच सरपंच अशोक मगरे उपसरपंच प्रकाश जाधव संजय नांगरे पाटील नितीन शिंदे चंद्रकांत पाटील तसेच सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
मारूल हवेली च्या कुस्ती आखाड्यात पैलवान संतोष पडळकर विजयी
RELATED ARTICLES