कराड : स्वच्छ कराड सुंदर कराड मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानक व्यवस्थापनाच्या गलस्थान कारभारामुळे या बसस्थानकाच्या सौंदर्याला बट्टा लागला आहे. बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव आहे त्याच बरोबर प्रवाशंाना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या नादुरूस्त झाल्या आहेत. पिण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाणी टाकीजवळ अस्वच्छता पसरली आहे मात्र एस.टी प्रशासनाला याचे सोईरसुतक नाही. तरी वरिष्टांनी या कामी लक्ष घालुन बस स्थानक निटनेटके ठेवावे अशी मागणी प्रवाशातुन होत आहे. विद्यमान आ. पृथ्वीराम चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड एस.टी.बस स्थानक नुतनीकरणाचा निर्णय घेऊन या बस स्थानकच्या इमारतीसाठी कोटी रूपयांचा निधी उपलब्ध दिला. सदर बसस्थानकाचे उद्घाटन जानेवारी 2019 रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यंाच्या हस्ते मोठया दिमाखात झाले त्यावेळी त्यंानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अभिनंदन करून कराड आगारातील इमारतीचा फार्मुला राज्यातील बसस्थाानकात राबवणार असल्याचे सांगितले मात्र येथे उभारण्यात आलेल्या देखण्या बसस्थानकाची दयनिय अवस्था प्रशासकीय अधिकार्यांच्या मनमानी कारभार व आम्हाला काय देणे घेणे लागत नसल्याच्या भुमिकेमुळे झाली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानक आवारात स्वच्छतेचा अभाव आहे. प्रवाशांना बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या काही खुर्च्यांची मोडतोड झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ अस्वच्छता झाली आहे. वास्तविक बसस्थानकाची देखभाल करणे एस.टी. महामंडळाचे म्हणजेच स्थानिक प्रशासकीय अधिकार्यंाचे काम आहे. मात्र येथील अधिकार्यंानी झोपेचे सोंग घेतल्याने बसस्थानकाला कोणी वालीच नाही असे झाले आहे. तेंव्हा महामंडळाच्या डी. सी.यांनी या कामी लक्ष घालुन येथिल प्रशासकीय अधिकार्यांची कान उघटनी करावी तसेच वेळ प्रसंगी काम चुकार अधिकार्यंाची बदली करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.
स्वच्छ व सुंदर बस स्थानकाची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्दशा
RELATED ARTICLES