कराड दक्षिण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मेरा बुथ सबसे मजबुतचा दिला नारा
कराड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील बुथ कार्यकर्त्यांशी आणि शक्ती केंद्रप्रमुखांशी लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कराड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचाही या लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी श्री. मोदी यांनी मेरा बुथ सबसे मजबुतचा नारा देत सरकारच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बुथ कार्यकर्त्यांनी घर चलो अभियान राबविण्याचे आवाहन केले.
नांदलापूर येथील जाई मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रमुख वक्ते अभय भंडारी, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, विस्तारक आनंदराव शिंदे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुकुंद चरेगावकर, घन:शाम पेंढारकर, अशोकराव थोरात, मोहनराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्री. मोदी म्हणाले, की वैभवशाली भारताच्या निमार्णसाठी आपल्याला प्रयत्न करायचा असून, यातूनच नव्या भारताचा संकल्प पूर्णत्वास जाणार आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काही लोक महामिलावट आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले असून, त्यांचे हेतू जनतेला समजावून सांगण्याचे काम बुथ प्रमुखांनी करावे. तसेच भाजपा परिवारात देशातील अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
पक्षाचे निरीक्षक अभय भंडारी यांनी गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश व राज्यात राबविलेल्या विविध विकासकामांची सविस्तर मांडणी केली. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने देशात अनेक विकासकामे केली.
भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदींनी साधला महासंवाद
RELATED ARTICLES