कराड: गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात बसस्थानाकातुन वाहत आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने नवग्रह मंदिरासमोरील रस्त्याचा मुरूम वाहुन गेल्याने मोठा खकृा पडला आहे. या खड्ड्यातुन दुचाकी चालवताना अपघाताची मालिका सुरू आहे. त्यामुळे नगरपालिका व एसटी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील पुतळयापासुन बसस्थानक व प्रांत कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर नवग्रह मंदीरासमोर लोखंडी खांब लावुन रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. बसस्थानक, प्रांत कार्यालय, वाहतुक शाखा, तालुका कृषी कार्यालय आदी ठिकाणी येणार्या लोकांची संख्या जास्त असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते.
कराड आगारातील गटर तुंबल्याने व नादुरूस्त झाल्याने बसस्थानाकातील गटारीचे पाणी गेल्या अनेक दिवसांपासुन नवग्रह मंदिरासमोरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून वाहत आहे. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे बसस्थानकातील व गटारीतील पाणी रस्त्यातुन वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे नवग्रह मंदिरासमोरील लोखंडी खंाब लावलेल्या रस्त्यातील मुरूम वाहुन गेल्याने मोठा खकृा पडला आहे. दुचाकीस्वांरांना या खकृयांतुन कसरत करीत दुचाकी चालवावी लागत आहे. खडयांचा अंदाज न आल्याने वारंवार येथे अपघातही होत आहेत.
कोटयावधी रूपयांचा निधी खर्चंुन बसस्थानकाची इमारत बांधण्यात आली. मात्र बसस्थानकात पडणारे पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी काहीच सोय केलेली नाही. त्यामुळे हे पाणी रस्त्यातुन वाहत आहे. पाऊस सुरू असताना नवग्रह मंदिरासमोरून पादचारी व प्रवाशंाना चालताही येत नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकातील रस्त्यावरून वाहणार्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. बसस्थानाकातील पाणी गटारात सोडावे, अशी मागणी होत आहे.
बसस्टॅन्डच्या प्रवेशद्वारात वाहन चालकांची कसरत
RELATED ARTICLES