Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकळके प्रतिष्ठानच्या वतीने शाहू महाराज जयंती उत्साहात

कळके प्रतिष्ठानच्या वतीने शाहू महाराज जयंती उत्साहात

कराड ः आप्पासाहेब कळके कदम प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शाहू चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब कळके कदम म्हणाले, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. सतीश पाटील, नगरसेवक किरण पाटील, बबनराव शिंदे, शिवाजीराव चव्हाण, अ‍ॅड. राहूल पाटील, डॉ. इनामदार, रोहन विभूते, फारूक शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्तात्रय दुपटे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular