Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीरक्तदान हे जीवनदान: भिडे गुरूजी

रक्तदान हे जीवनदान: भिडे गुरूजी

कराड: रक्तदान हे जीवनदान आहे. ते उदात्ततेचे, देशभक्तीचे प्रतिक आहे. रक्तपेढीचा उपक्रम नितांत गरजेचा असुन सारा भारतीय सामाज हा भारतमातेची रक्तपेढी आहे. रक्ताची उपलब्धता वाढवण्यासाठी, हा उपक्रम सशक्त करण्यासाठी समाजातील धनवंतंानी रक्तपेढयंाना सढळ हस्ते मदत केली पाहिजे असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मार्गदर्शक संभाजीराव भिडे गुरूजी यंानी केले.
डॉ. सुभाषराव एरम, डॉ. पी.जी. फाटक, डॉ. वैभव चव्हाण, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. भवानी प्रतिष्ठान कराड संचलित महालक्ष्मी ब्लड बँकेचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यवस्थापिका विणा ढापरे भाजपा, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष घन:श्याम पेंढारकर उपस्थित होते. भिडे ते म्हणाले, कृष्णा कोयनाच्या प्रितीसंगमावर वसलेली कराड ही शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भुमी सुरू झालेल्या रक्तपेढीस माझे पुर्ण सहकार्य राहील रूग्णासाठी रक्त देत असताना शत्रुचे रक्त शोषण्यासही आपण शिकले पाहिजे असे सांगत त्यांनी अनेक स्फुर्तिदायक प्रसंग सांगत उपस्थितांच्या मनामध्ये रोमांच उभा केला.
यावेळी बोलताना डॉ. सुभाषराव एरम रक्त, रक्ताचे विघटन, त्यातील घटकांचा डेंग्यु तसेच विविध आजारात होणारा उपयोग यांचे विवेचन केले. प्रास्ताविकात घन:श्याम पेंढारकर यंानी हा उपक्रम सुरू करण्यामागची भुमिका स्पष्ट करून सांगितली. यावेळी मान्यवरांचा,शिबिर आयोजक, तंत्र यंाचा सत्कार करण्यात आला. संभाजीराव भिडे गुरूजींचा परिचय कु. स्वराली ढापरे हिने करून दिला.
सुत्रसंचालन विवके ढापरे, यांनी तर आभार प्रदर्शन विणा ढापरे यांनी केले. करपे धर्मशाळेत वंदे मातरम ने सांगता झालेल्या या कार्यक्रमास लक्षणीय उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular