शिवनगर: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक अमोल गुरव, जितेंद्र पाटील, निवासराव थोरात, पांडुरंग होनमाने, म्हाडाफचे संचालक आनंदराव मोहिते, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर आदींनी थोर विचारवंत यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
प्रारंभी श्री. जगताप म्हणाले, भाऊंचे सहकार चळवळीत मोलाचे योगदान आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. श्री. कापूरकर यांनी भाऊंच्या जीवनचरित्राची जडणघडण व त्यांचे योगदान आपल्या अभिवादनपर भाषणात उपस्थितांसमोर मांडले. सूर्यकांत दळवी यांनी आभार मानले.
यावेळी सेक्रेटरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, चीफ इंजिनिअर सुहास घोरपडे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, असि. जनरल मॅनेजर (डिस्टलरी) प्रतापसिंह नलवडे, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, सिनीअर सिव्हील इंजिनिअर डी. व्ही. कुंभार, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, इरिगेशन मॅनेजर आर. जे. पाटील, मटेरिअल मॅनेजर रविंद्र देशमुख, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, ऑफिस सुप्रीटेडेंट निलेश देशमुख, स्टोअर किपर जी.बी.मोहिते, सॅनिटरी इन्स्पेक्टर व्ही. जी. पवार, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील आदींसह सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
थोर विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊंना कृष्णावर अभिवादन
RELATED ARTICLES