Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीएक हात मदतीचा या संकल्पनेतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश

एक हात मदतीचा या संकल्पनेतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश

कराड : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातून वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. लोकप्रतिनिधी या नात्याने कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदत स्वरूपात आलेले धनादेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून सुपुर्त करण्यात आले.
याप्रसंगी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, पालचे सरपंच जगन्नाथ पालकर, भास्करराव गोरे, उद्धवराव ङ्गाळके, सचिन लवंदे, मुकुंद खंडाईत, आप्पासाहेब खंडाईत, युवराज गोरे, बाबा शेळके, सैनिक घाडगे, संजय काळभोर तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. पूर ओसरल्यानंतर अजूनही अनेक कुटुंब स्थिरस्थावर झालेली नाहीत. पुरामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांचे दैनंदिन जनजीवन स्थिरस्थावर व्हावे यासाठी कराड उत्तर मतदारसंघातून मोठया प्रमाणात मदत करण्यात येत आहे.
आ.बाळासाहेब पाटील यांनी यांच्याकडे अनेकांनी मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश आज आ.बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्त केला आहे.
यावेळी खंडोबा देवस्थान समिती व ग्रामस्थ पाल यांच्यावतीनेही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्त कारण्यात आला आहे. कराड उत्तर मतदार संघात पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या बंधार्‍यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासंबंधी, व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना युद्धपातळीवर जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. महापुराचा ङ्गटका कराड उत्तर मतदार संघात बंधार्‍यांचे बसला आहे तर अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून याकरता मदत मिळावी असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular