Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीगणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदी वातावरण

गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदी वातावरण

कराड : पुरपरस्थिती महागाईचे सावट असले तरी श्री गणेशाच्या आगमणाने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. गणपतीबाप्पा मोरय्याचा सर्वत्र जयघोष दिसत होता. गणेश चतुर्थीच्या पुर्व संध्येला अनेकांनी गणेशमुर्ती घेऊन जाणे पसंत केले. तर उर्वरित सार्वजनिक गणेश मंडळ व नागरिकांनी आज वाजत गाजत गणरायांची प्राणप्रतिष्ठापना केली.
येथील कुंभारवाडयातील मुर्तीकांरानी बनवलेल्या श्रीगणेशाच्या मुर्ती नेण्यासाठी सार्वजनिक गणेशमंडळे व नागरिकांनी सकाळपासुनच गर्दी केली होती. यावर्षी पुरग्रस्त परिस्थिती व महागाईचे संकट आहे. याही परस्थितीत गणेश भक्तांनी मोठया भक्तीभावांने श्री गणेशाचे स्वागत केले. बँन्ड, बँन्जो यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे अनेक सार्वजनिक गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांच्या आंनदावर विरजन पडले होते.त्यामुळे काही मंडळांनी बॅन्ड, बॅन्जोला फाटा देत. गणपती बप्पा मोरय्या या जयघोषाला पसंती दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular