कराड: मुस्लिम बांधवांचा मोहरम सण मोठ्या उत्साहात कराडमध्ये साजरा करण्यात येतो. सालाबादप्रमाणे मंगळवार दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 1 वाजेदरम्यान कराड शहरांमधून पंजाची भेट मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती अस्लम मुजावर यांनी दिली.
मोहरम सणाचे औचित्य साधून दरगाह ऑफ शेख फरीदुद्दीन और कराडी पीर येथे मुजावर समाजातर्फे पंजे बसविणवत येणार आहेत. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 नंतर संदल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 7 सप्टेंबर रोजी करडी पीर या दर्गाचा ऊरुस (यात्रा) होत असून 9 सप्टेंबर रोजी कतल रात आहे.
तसेच 7 सप्टेंबर रोजी मोहरम सणानिमित्त ऊरुस (यात्रा) ला येणाऱया भाविकांसाठी सालाबादप्रमाणे मुजावर समाजातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरला पंजांचे (ताबूत) विसर्जन मिरवणूक दुपारी 1.30 ला निघणार असल्याची माहिती मुजावर समाजातर्फे अस्लम बशिरुद्दीन मुजावर यांनी दिली.
मोहरम सणाची जोरदार तयारी
RELATED ARTICLES