Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी‘ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करणार’

‘ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करणार’

कराड: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला उभा करण्यात ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर नवी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम त्यांनी केले असून, त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. कराड येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या 28 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सुरेखाताई पालकर, मुकुंद कुलकर्णी, अशोकराव भोसले, इब्राहिम सय्यद, दिलीप कुलकर्णी यांचा सत्कार ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
ना. डॉ. भोसले पुढे म्हणाले, देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास देदीप्यमान आहे. यात सर्वात मोठे योगदान ज्येष्ठांचे असून त्यांना समाजात आदर आहे. त्यांच्या विचारांवर नवीन पिढी घडत असते.
ज्येष्ठ नागरिक संघटना गेली 28 वर्षे चांगले काम करत असून, त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आरोग्य शिबीरे घ्यावीत. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा शासनाकडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.
सत्कारास उत्तर देताना मुकुंद कुलकर्णी म्हणाले, की डॉ. अतुलबाबांसारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाकडून आमचा सन्मान होणे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.
संपूर्ण भोसले कुटुंबीय आत्मीयतेने लोकांची कामे करतात. आप्पासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे इथे हजारो परिचारिका, डॉक्टर घडले. त्यांनी उभारलेल्या कृष्णा रुग्णालयामुळे लाखो रुग्णांवर उपचार झाले.
त्यांचा वारसा डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले समर्थपणे चालवत आहेत. ज्येष्ठ नागरिक आपल्या कामावर खुश आहेत. इथून पुढेही आपल्याकडून समाजसेवा घडत राहो व आपणांस यश मिळो, अशी सदिच्छा श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
यावेळी सत्कारमूर्तींसह पंडितराव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा नीता शिंदे, उपाध्यक्ष पंडितराव देशपांडे, कार्यवाह नामदेवराव शिंदे, सहकार्यवाह बाळकृष्ण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी एअर फोर्स ऑफिसर बाळकृष्ण जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नीता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नामदेवराव शिंदे यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular