केळघर : सामाजिक कार्याची आवड असणार्या सुरेश चिकने यांचा गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक अशोक पवार यांनी केले.
भैरवनाथ विद्यालय केळघर (ता. जावली) येथे आयोजित मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी मानव कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा.तुकाराम ओंबळे, जन्निमाता भजन मंडळाचे संचालक सुरेश चिकने व तळोशीचे सरपंच संतोष चिकने यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सुरेश चिकने यांचे तर्फेमान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, डिक्शनरी, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स व छत्री इ.शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. तुकाराम ओंबळे यांनी सुरेश चिकने हे सामाजिक कार्याची आवड असलेले सेवाभावी व उत्साही व्यक्तिमत्व असून ते केळघर-केडंबे परिसरातील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे मदत करीत असल्याचेसांगितले.
शेवटी प्रा.ओंबळे यानी चिकने यांच्या या मदतीचा उपयोग करून चांगले ज्ञान व उत्तम गुणवत्ता संपादन करावी असे विद्यार्थ्यांनाआवाहन केले. याप्रसंगी बोलताना सुरेश चिकने म्हणाले, मला सामाजिक कार्याची प्रेरणा मानव कल्याण सेवा संस्थच्या कार्यातून मिळाली असून गरीबगरजू विद्यार्थ्यांना मदत करणे मी माझे कर्तव्य समजतो.
श्री. देवकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. श्री गाडे सर यांचे कार्यक्रम आयोजन नियोजन कामी सहकार्य लाभले.
‘सुरेश चिकने यांचा मोफत शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम कौतुकास्पद’
RELATED ARTICLES

