Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हास्तरिय शालेय मैदानी स्पर्धेत वेण्णा ज्युनि.महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

जिल्हास्तरिय शालेय मैदानी स्पर्धेत वेण्णा ज्युनि.महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

केळघर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्यावतीने छ.शाहू क्रीडा संकुल सातारा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात थाळी फेक या क्रीडा प्रकारात वेण्णा ज्युनि.महाविद्यालय मेढा ता.जावली या शाळेचा खेळाडू भूषण कांबळे याने सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.त्याची सातारा येथे होणार्‍या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच वैष्णवी सपकाळ हिने 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला.
या खेळाडूंना क्रिडाशिक्षक विक्रम उंबरकर यांनी मार्गदर्शन केले. मैदानी स्पर्धेत वेण्णा ज्युनि.महाविद्यालय मेढा येथील खेळाडूनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख अलका संकपाळ,प्राचार्य श्रीनिवास सणगर,विभाग प्रमुख बी.बी. पाटील सर,जावली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गाडवे सर,उपाध्यक्ष जाधव सर, क्रिडाशिक्षक अशोक लकडे, सुनिता कामटे, पोफळे सर व शिक्षकांनी अभिनंदन केले असून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular